चिटणीसपदी गणेश पोळ यांची निवड.
भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुका पूर्व मंडळ कार्यकारणी मध्ये भाटनिमगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच गणेश पोळ यांची चिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी पूर्व मंडळ तालुका अध्यक्ष राम आसबे यांनी पोळ यांची निवड झाल्याचे पत्र दिले आहे. पोळ यांनी २०१४ ते २०१९ या काळात भाटनिमगाव ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून काम केले आहे.
यावेळी गणेश पोळ म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देशाचा व राज्याचा विकास सुरू आहे, भारतीय जनता पक्ष सर्व घटकांना सोबत घेऊन काम करत असल्याने भविष्यात इंदापूर तालुक्यात संघटना वाढीसाठी प्रयत्न करू, आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक यश मिळेल याकडे आम्ही लक्ष देऊ.
भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे, महामंत्री आकाश कांबळे, तालुका अध्यक्ष राम आसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व मंडल मध्ये संघटना वाढीसाठी तसेच भारतीय जनता पार्टीचे विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी काम करू.



