Uncategorized
वडापुरी गणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना खबाले आज अर्ज दाखल करणार.
विजय शिंदे
पुणे जिल्हा परिषद व इंदापूर पंचायत समितीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी (२१) भाटनिमगाव ग्रामपंचायतच्या माजी सरपंच अर्चना अजित खबाले या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून वडापुरी गणासाठी अर्ज दाखल करणार आहेत.
अर्चना खबाले यांनी गेली पाच वर्षे भाटनिमगाव ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून काम केले आहे. त्यांचे पती अजित खबाले हे परिसरात सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असतात.आज भाटनिमगाव येथून रॅली काढत त्या तहसील कार्यालय इंदापूर येथे हलगीच्या निनादात कार्यकर्त्यांसोबत जाऊन आपला अर्ज दाखल करणार आहेत.



