Uncategorized

दिवसभर जवळपास दोनशेहून अधिक ग्राहक; मोटार सायकलचा प्रवास,गावोगावी जाऊन भेळ विकणाऱ्या “या” विक्रेत्याची वाट पाहत बसतात खवय्ये.

इंदापूर प्रतिनिधी.

आपल्याला वेगवेगळ्या चटपटीत पदार्थांचा आस्वाद घेण्याची इच्छा होते. लहान असो की मोठे सर्वांना भेळ, पाणीपुरी खायला आवडते. त्यात टेस्टी आणि यम्मी, चटपटीत भेळ कुठे मिळत असेल तर आपण आवर्जून तिथे जातो.परंतु इंदापूर तालुक्यातील वकीलवस्ती येथील भीमराव शिंदे हा भेळ विक्रेता गेली ३५ वर्षापासून मोटार सायकल वरून गावोगावी जाऊन चटपटीत भेळची विक्री करत आहे.

शिंदे यांची वाट बघत माणसं गर्दी करून, नंबर लावून आवडीने भेळचा आस्वाद घेतात भेळ म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. ओली आणि सुखी असे भेळचे दोन प्रकार असतात.पूर्वी हात गाडीवर हे भेळ सेंटर होत यानंतर शिंदे हे मोटार सायकल वरून वकीलवस्ती शेजारील सुरवड,वडापुरी, अवसरी, भांडगाव, शेटफळ या गावी जाऊन भेळची विक्री करत आहेत.

दिवसभर जवळपास दोनशेहून अधिक ग्राहक भेळ चा आस्वाद घेतात. येथील भेळची किंमत 30 रुपये अशा दराने विकली जाते.हातगाडीवर सुरू केला होता व्यवसाय, दिवसेंदिवस वाढती गर्दी घरी बनवलेले फरसाण, शेव, कुरकुरीत मुरमुरे, पापडी, चिरलेला कांदा, काकडी, कोथिंबीर, तळलेली हिरवी मिरची, लाल मिरचीचा भुरका, चिंच गूळ चटणी, या सर्वांच्या मिश्रणातून ही चटकदार, चमचमीत, स्वादिष्ट भेळ बनते.

शाळेतील लहान मुले, वयस्कर, तसेच तरुण या भेळ विक्रेत्या भीमराव शिंदे यांची गावातील पारावर, रस्त्यावर वाट पाहत बसलेले असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button