इंदापुरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देणार.!! माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बोलून दाखवलं.!!

विजय शिंदे
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेच्या निवडणुका आम्ही लढवणार असून नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे मत माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले आहे.बखर लाईव्ह या यूट्यूब चैनल वरती संपादक उमेश घोंगडे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी विविध विषयावरती वार्तालाप केला आहे.
यावेळी त्यांनी विविध विषयावरती भाष्य केले आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये गट गण,प्रभाग रचना, आरक्षण सोडत, मतदार यादी हे अजून सर्व बाकी आहे हे झाल्यानंतर पुढील परिस्थिती पाहून ठरवू असे सूचक विधान त्यांनी यावेळी केले.
येणारी जिल्हा परिषद निवडणूक तुम्ही भाजप पक्षाकडून लढवणार असल्याची चर्चा आहे असा प्रश्न विचारण्यात आला यावरती हर्षवर्धन पाटील यांनी अशा चर्चेला अर्थ नसतो, अशी सूत्रांची माहिती कुठून येते हेच कळत नसल्याचे बोलून दाखवले.
यावेळी बोलताना ते म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी माझे कोणतेही वैयक्तिक वाद नाहीत, परंतु त्यांच्यात काय गैरसमज करून देणारे आहेत, त्यामुळे त्यांच्या मनात काय आहे हे मला माहीत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आजही माझे सलोख्याचे संबंध आहेत, संसदीय कार्यमंत्री असताना सर्वच राजकीय पक्षांच्या आमदारांशी माझे सलोख्याचे संबंध होते, ते आजही कायम आहेत व उद्याही राहतील.
इंदापुरात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी..
यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले इंदापूरची स्थानिक राजकीय परिस्थिती इंदापूर ची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्याने मला कार्यकर्ते व जनतेच्या आग्रहाने भाजप पक्ष सोडावा लागला,मी भाजप पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात नव्हतो. इंदापूर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होता. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही याची सर्व माहिती आहे.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास जनतेच्या हिताची विकास कामे करताना अधिक चांगले निर्णय घेता येतील.
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचा सिंहाचा वाटा..
राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी निवड होताना केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचा सिंहाचा वाटा होता. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी राष्ट्रीय सहकारी संघाच्या संदर्भात नेहमीच भेट होत असते, येणाऱ्या एक दोन दिवसात गुजरात येथे सहकार विभागाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्या ठिकाणीही आम्हाला राष्ट्रीय सहकारी संघाचे अध्यक्ष हे नात्याने आमंत्रण मिळाले आहे.



