Uncategorized

भरणे कुटुंबियातील दुसरी पिढी सक्रिय राजकारणात.! श्रीराज भरणे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार.

विजय शिंदे

पुणे जिल्हा परिषद व इंदापूर पंचायत समितीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी (२१)इंदापूर तहसील कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने मोठे शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.

यामध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे हे पहिल्यांदाच राजकीय आखाड्यात उतरणार असून इंदापूर पंचायत समिती साठी बोरी गणातून ते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. श्रीराज भरणे हे भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात तसेच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रचार सभा व सामाजिक उपक्रम याचे ते योग्य नियोजन करत असतात.

गेली अनेक वर्षांपासून श्रीराज भरणे हे इंदापूर तालुक्यात राजकीय सामाजिक कार्यात अग्रेसर असून त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे.श्रीराज भरणे यांच्या रूपाने भरणे कुटुंबातील दुसरी पिढी आता सक्रिय राजकारणात सहभागी होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button