Uncategorized
इंदापूर तालुक्याच्या पूर्व भागाला पावसाने झोडपले; भाटनिमगाव— बाभूळगाव परिसरात रस्त्यांना नद्याचे स्वरूप

विजय शिंदे
गेल्या चार दिवसांपासून इंदापूर तालुक्यास मॉन्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले आहे. मंगळवारी २७ रोजी इंदापूर तालुक्यातील पूर्व भागातममुसळधार पाऊस सुरू असून भाटनिमगाव— बाभूळगाव परिसरात रस्त्यांना नद्याचे स्वरूप आले आहे. मुक्त गोठ्यातील शेणखत, शेतीतील माती वाहून गेली आहे.
हाता तोंडाशी आलेली काढणीची पिके वाया गेली असून त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे, जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
रस्त्यावर पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुढील दोन दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले.



