Uncategorized

छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर श्री जय भवानी माता पॅनलचे वर्चस्व. सर्व २१ जागी उमेदवार विजयी.

विजय शिंदे

भवानीनगर (ता.इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे व साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या श्री जय भवानी माता पॅनेल ने दणदणीत विजय मिळवला आहे. श्री जय भवानी माता पॅनलचे २१ उमेदवार निवडून आले आहेत.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रविवार (ता.१८) रोजी पार पडली. जय भवानीमाता पॅनेल व श्री छत्रपती बचाव पॅनेल यांच्यामध्ये निवडणूक झाली. सोमवार (ता.१९) मतमोजणी करण्यात आली यावेळी पहिल्या फेरीपासून श्री जय भवानी माता पॅनलच्या उमेदवारांनी आघाडी घेतली.

श्री छत्रपती बचाव पॅनलचे उमेदवार पंचायत समितीचे माजी सभापती करणसिंह घोलप यांनी एकाकी झुंज देत सात हजार मतांचा टप्पा गाठला परंतु त्यांचाही पराभव झाला. उद्धट गटातून नवख्या असणाऱ्या पृथ्वीराज घोलप यांनी श्री जय भवानी माता पॅनल मधून विजय मिळवला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पृथ्वीराज घोलप यांना श्री जय भवानी माता पॅनल मधून संधी दिली होती. नवख्या असलेल्या पृथ्वीराज यांनी चांगल्या मताने विजय मिळवला यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विजयानंतर पृथ्वीराज घोलप यांनी प्रतिक्रिया दिली असून घोलप म्हणाले छत्रपतीचा सभासद सुज्ञ आहे उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे व साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वावर सभासदांनी विश्वास ठेवला आहे. येणाऱ्या काळात कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली काम करू. सभासदांनी आमच्या वर विश्‍वास दाखवला असल्याचे सांगून सभासदांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button