कुरवली ची अजित दादांची सभा पृथ्वीराज घोलप यांनी गाजवली; मुद्देसूद मांडणी करून सभासदाचे मन जिंकले.

उमेदवार पृथ्वीराज घोलप यांच्या भाषणातील काही मुद्दे..
— राज्य शासन आणि केंद्र शासनाची मदत घेवून किंवा NCDC च्या माध्यमातून आर्थिक मदत आणणेसाठी मा. अजित दादांची गरज आहे आणि हे फक्त दादाच या गोष्टी करू शकतात म्हणून आपल्याला अजित दादांच्या आणि भरणे मामांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना चालवायचा आहे.
— इंदापूर तालुक्याचे दमदार आमदार आणि राज्य किडा मंत्री मा. दत्ता मामांच्या मदतीने आपण शिक्षण संस्थेसाठी किडांगण किंवा करखान्यासाठी पण काही उपाययोजना त्यामाध्यमातून करता येतील याच्यासाठी आपण मामांचं मार्गदर्शन पण महत्वाचे आहे.
— आदरणीय जाचक बापूंच्या रक्तातच श्री छत्रपती कारखान्याचा वंश आहे ज्यांच्या घरात आणि रक्तातच कारखान्याबद्दल आत्मियता आली आहे म्हणून आपण कारखान्यात बापुंच्या नेतृत्वात काम कराचे आहे.
— दादा, मामा आणि जाचक बापूंच्या नेतृत्वामध्ये नवीन संचालक मंडळ स्थापन झाल्याबरोबर निधी बाबत आणि सर्व तांत्रिक यंत्रणा सुरू करणे बाबत तसेच जास्तीत जास्त उस आणून मोठ्या प्रमाणावर गाळप करणेवर त्वरीत कार्यवाही सुरू करून सर्व संचालक मंडळ यांना जबाबदारी वाटून दिली जाईल.
सर्व कामगार लोकांचा काही प्रश्न माझे कानावर आलेत आणि त्यासाठी बोर्डाच्या पहिल्या किंवा दुस-या मिटींगमध्ये त्याची संपुर्ण माहिती घेवून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला जाईल त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही याची संपूर्ण दक्षता घेण्याचा प्रयत्न केला जाईल इतरही काही गोष्टी आहेत जे आता त्यावर भाष्य करणे योग्य नाही. शेवटी शिपाई पासून ते एम.डी. पर्यंत आणि सर्व संचालक मंडळ आणि सभासद या सर्वांचे प्रयत्न पणाला लागणार आहेत कारण यावरच आपल्या सर्वांचा प्रपंच उभा आहे.
आगामी काळात सर्व संचालक मंडळ आणि सर्व कामगार यांची एकजुटीने टीम करून आम्ही सर्व प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आमचा संपुर्ण वेळ देवून कारखान्याची परीस्थिती सुव्यवस्थित आणणेसाठी योगदान देणार आहोत.
सगळ्यात महत्वाचा विभाग तो म्हणजे शेतकी विभागाच्या माध्यमातून हार्वेस्टिंगच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त उस उपलब्ध करून जास्त गाळप कसे होईल याकडे लक्ष केंद्रित केले जाईल तसेच वाहतूक तोडणी संदर्भात जास्तीत जास्त करार करून मोठ्याप्रमाणात कशिंग करण्यासाठी प्रयत्नशील राहूकारखान्याचे सर्व विभाग जसे की इंजिनिअरिंग, उत्पादन विभाग, स्टोर, डिस्लरी- पर्यावरण, शेतकी केन यार्ड विभाग, इत्यादी विभागामध्ये संचालक मंडळ प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी करून सर्व विभागामार्फत सर्व कामकाज बारकाईने केले जाईल.
कारखान्याच्या मदतीने सर्व गटामधून शेतकरी सभासदांशी संपर्क वाढवून त्यांच्या अडचणी समजून मार्ग काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहूसर्व उस उत्पादक सभासदांचा उस गाळपास आणून तसेच गेटकेन वर भर देवून आपल्या कारखान्याचे जास्तीत जास्त कशिंग कसे वाढेल याकडे पाहिले जाईल कारण कशिंग जेवढे जास्त तेवढा करखान्याला फायदा होईलखर्चावर नियंत्रण करून सर्व गोष्टींची काटकसर करून कारखाना जास्तीत जास्त नफा मिळणेसाठी वेगळे उपाययोजना करूआपल्याला अजित दादांची खंबीर साथ असल्याने आणि मामांची पण साथ असल्याने कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही याची आपण सर्वांनी खात्री बाळगावी.
आता सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी तंतोतंत केल्यास आपला छत्रपती कारखाना येणा-या काळात राज्यात पहिल्या ५ मध्ये आणल्याशिवाय राहणार नाही याची तुम्हाला सर्व सभासदांच्या साक्षीने ग्वाही देतो.
शिक्षण संस्थेचे सर्व प्रश्न आणि अडचणी दुर करून तेथे बारामती किंवा इंदापूर तालुक्यातील विशेषता आपल्या भागातील सर्व विद्यार्थ्यांना कसे दर्जेदार शिक्षण देण्याचं काम केले जाईल आणि त्यासाठी पुढील महिन्यात जून मध्ये संस्थेवर कमिटी नेमूण जास्त प्रवेश करणे गजरेचे असून सर्व कर्मचारी यांचेपण अडचणी दूर करणार आहोत.
मोठ्या संख्येने सभासदांची उपस्थिती..
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल इंदापूर तालुक्यातील कुरवली येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते मात्र सभेच्या ठिकाणी पाऊस सुरू झाल्याने सभेचे ठिकाण बदलावे लागले. परंतु पडत्या पावसातही सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या सर्व सभासदांचे पृथ्वीराज घोलप यांनी आभार मानले.



