Uncategorized

छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी आज शपथ दिली.

विजय शिंदे

महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती. आता त्यांना मंत्रिपद देऊन नाराजी दूर करण्यात येत आहे.

मंगळवारी राजभवनात 50 लोकांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी सोमवार रात्रीपासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी 9 वाजता राजभवनामध्ये हजर राहण्याच्या सूचना अनेकांना देण्यात आल्या आहेत.

धनंजय मुंडेंचे खाते छगन भुजबळांकडे

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. आता तेच खातं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळाना देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button