लवकरच शाळांच्या घंटा वाजणार.!! तारीख आली समोर.

विजय शिंदे
राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष शाळा कधी सुरू होणार याकडे लागले आहे. अशात राज्यातील शाळा कधीपासून सुरू होणार याची तारीख समोर आली आहे.
सीबीएसई बोर्डाच्या शाळा ९ जूनपासून सुरू होणार आहे. तर एसएससी बोर्डाच्या शाळा १६ जूनपासून सुरू होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये लवकरच शाळांच्या घंटा वाजणार आहे. उन्हाळी सुट्ट्या संपत आल्या असून आता लवकरच शाळा सुरू होणार आहे. सीबीएसई बोर्डाची शाळा येत्या ९ जूनपासून सुरू होणार आहे. तर महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा १६ जूनपासून सुरू होणार आहे.
नवीन शैक्षणिक वर्षासाठी पालक, विद्यार्थी आणि शिक्षक वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळेत परतण्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी सुरु झाली आहे. अनेक शाळांनी आधी प्रवेशप्रक्रिया, पुस्तकांचे वाटप आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या योजनांचे काम पूर्ण केले आहे.