भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस(महामंत्री) पदी आकाश कांबळे यांची निवड.

विजय शिंदे
इंदापूर येथील भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आकाश कांबळे पुणे जिल्हा सरचिटणीस (महामंत्री) पदी फेर निवड करण्यात आली आहे.यापूर्वी कांबळे यांनी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे सचिव,सरपंच परिषद अध्यक्ष अशा विविध सामाजिक राजकीय पदावर काम केले आहे.
यावेळी बोलताना आकाश कांबळे म्हणाले भारतीय जनता पार्टीने एका ग्रामीण भागातील तरुणाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदाची जबाबदारी दिली हि जबाबदारी पार पाडत असताना पदाला साजेसे काम करण्याची संधी मला मिळाली.
तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथे झालेली पोटनिवणुक,कोल्हापूर पोटनिवडणूक, गोवा विधानसभा या ठिकाणचा निवडणूक प्रक्रियेत माझा निवासी सक्रिय सहभाग होता. विविध आंदोलने, पक्षाचे विविध उपक्रम राबविले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस,भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद् चव्हाण, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील,भाजपा महामंत्री राजेश पांडे, पुणे जिल्ह्याचे समन्वयक व दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल, भाजपा नेते प्रवीण माने,जिल्ह्यध्यक्ष शेखरभाऊ वढणे, भाजपा नेते वासुदेव काळे, भाजपा ज्येष्ठ नेते बाळासाहेब गावडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे ग्रामीण दक्षिण जिल्ह्यात पक्ष संघटना वाढविण्याचे काम करणार असल्याचे कांबळे म्हणाले.



