Uncategorized

‘इंडिया-ब्राझील शुगर अँड बायो एनर्जी मिशन’ या अभ्यास दौऱ्यात महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात काम करणारे नेतेमंडळी सहभागी.!!

विजय शिंदे

जगातील सर्वाधिक ऊस उत्पादन करणारा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राझीलमध्ये आयोजित ‘इंडिया-ब्राझील शुगर अँड बायो एनर्जी मिशन’ या अभ्यास दौऱ्यात महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात काम करणारे नेतेमंडळी सहभागी झाले आहेत.दि.१५ जून पासून एक आठवड्याचा हा अभ्यास दौरा आहे.

ब्राझिलमध्ये ते ऊस उत्पादकांच्या फायद्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची पाहणी करत आहेत.भारताच्या नॅशनल शुगर फेडरेशनच्या पुढाकाराने आयोजित या दौऱ्याचा उद्देश ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून साखर व सहउत्पादनांच्या माध्यमातून उद्योगास उभारी देणे, तसेच नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने ऊस उत्पादकांना अधिक समृद्ध बनविणे हा आहे.

या अभ्यास दौऱ्यात राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, खासदार बजरंग सोनवणे. आमदार अभिजीत पाटील तसेच नॅशनल शुगर फेडरेशनचे विविध तज्ञ सहभागी झाले आहेत.साखर उद्योगासाठी लागणारे नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान, जैवऊर्जा निर्मितीची प्रगत साधने आणि सहउत्पादनांच्या नव्या शक्यता यांचा सखोल अभ्यास या मिशनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button