Uncategorized

सरपंच–ग्रामसेवकांच्या मनमानीला कारभाराला कंटाळून ग्रामपंचायत सदस्य देणार राजीनामा.

विजय शिंदे.

बाभुळगाव ग्रामपंचायतीतील सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा येणार असल्याचे संगीता इंगळे यांनी सांगितले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या गावातील विकासकामे थांबली असून निधीचा पारदर्शक वापर न होणे, सदस्यांचा सल्ला न घेता निर्णय घेणे अशा अनेक तक्रारींमुळे आपण सदस्य पदाचा राजीनामा देणार आहोत.

“ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक कोणत्याही कामाची माहिती गावकऱ्यांना देत नाहीत. निधी खर्चातही अनियमितता आहे. यामुळे गावकऱ्यांसमोर आमची प्रतिमा मलिन होत आहे. अशा परिस्थितीत आम्ही या अन्यायकारक व मनमानी कारभाराचा भाग होऊ शकत नाही.”लोकांनी विकासासाठी निवडून दिले, मात्र ग्रामसेवक व सरपंच यांच्या हुकूमशाहीमुळे ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे.

इंगळे यांना दिलेला शब्द पाळला नसल्याची चर्चा..

संगीता इंगळे या सत्ताधारी गटाच्या सदस्य असून त्यांना सरपंच पदाचा दिलेला शब्द पाळला नसल्याची चर्चा बाभूळगाव व परिसरात आहे. ग्रामपंचायत वरती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गटाची सत्ता होती परंतु सरपंच व काही सदस्यांनी तत्कालीन मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. इंगळे या हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत राहिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button