Uncategorized
सराटी येथील पशुपालकाच्या गोठ्यातील तीन जर्सी गाईंची चोरी; अज्ञात विरोधात गुन्हा दाखल.

विजय शिंदे
सराटी (ता. इंदापूर) येथील पशुपालकाच्या गोठ्यातील तीन जर्सी गाईंची शुक्रवारी (ता.13) मध्यरात्री चोरी झाली.याबाबत संतोष त्र्यंबक कोकाटे (वय 48) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या शेतामध्ये पत्रा शेड मारून त्यास लोखंडी जाळीचे कुंपण घालण्याचे काम चालू आहे. त्यामध्ये जर्सी जातीच्या गाईचे बंदिस्त पालन केले आहे.
शुक्रवारी मध्यरात्री त्यामधील अंदाजे प्रत्येकी 25 हजार रुपये किमतीच्या काळ्या व पाढऱ्या रंगाच्या दोन गायी, तसेच 25 हजार रुपये किमतीची बारीक काळे ठिपके असलेले पांढऱ्या रंगाची गाय, अशा एकूण 75 हजार रुपये किमतीच्या तीन जर्सी गाई चोरट्याने चोरून नेल्या. याबाबत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे



