Uncategorized
“भैरवनाथाच्या नावानं चांगभलं” या घोषाने भाटनिमगाव येथील भैरवनाथाची यात्रा संपन्न…

विजय शिंदे
भाटनिमगाव (ता. इंदापूर) येथील श्री.भैरवनाथ महाराजांची यात्रा भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी झाली. यात्रेनिमित्त ‘चांगभलं’ च्या गजरात गुलाल उधळत, पालखी सोहळा आणि घोड्याच्या मिरवणुकीने भाविक भक्तीरसात न्हाऊन निघाले.
शुक्रवार, दि.१० एप्रिल रोजी ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीत श्री.भैरवनाथाची पालखीसह गुलाल खोबऱ्याची उधळण करत भव्य मिरवणुक निघाली, यावेळी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.



