इंदापूर तालुक्यातील सहकार व सामाजिक क्षेत्रात मंगेश (बाबा) पाटील यांचे योगदान मोठे.
विजय शिंदे
स्वर्गीय मंगेश (बाबा) पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने इंदापूर शहरामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदापूर नंबर ४ व ६ येथे सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी इंदापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक शेखर पाटील, रूपाली मंगेश पाटील,भाग्यश्री अभिजीत पाटील यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले.
या वेळी जिल्हा परिषद नंबर ४ चे मुख्याध्यापक वासुदेव पालवे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर ६ चे मुख्याध्यापक विलास शिंदे, शाळेतील शिक्षक विकास घुगे, वैजंता घुगे, सुरेश लोंढे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गौरी अमोल मखरे वैशाली गणेश जामदार उपस्थित होते.
यावेळी बोलताना शेखर पाटील म्हणाले आमचे चुलते स्वर्गीय मंगेशबाबा पाटील यांची आज जयंती आहे इंदापूर तालुक्यातील सहकार व सामाजिक क्षेत्रात मंगेश (बाबा) पाटील यांचे योगदान मोठे होते, इंदापूर तालुक्यात विविध संस्थांचे पदाधिकारी म्हणून बाबांनी काम केले, ते आज आपल्यात नसले तरी गरीब गरजू नागरिकांना मदत करण्याची त्यांची वृत्ती पुढेही कुटुंब म्हणून आम्ही जोपासत आहोत.



