Uncategorized

घोलप कुटुंबीयांच्या दोन पिढीची पुण्याई तिसऱ्या पिढीच्या कामी येणार.?

विजय शिंदे

इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज माघार घेण्याच्या अखेर च्या क्षणा पर्यंत घडामोडींनी वेग घेतला.उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे व पृथ्वीराज जाचक एकत्र येऊन हि निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत असतानाच यामध्ये इंदापूरचे माजी आमदार स्वर्गीय राजेंद्रकुमार घोलप यांचे नातू अविनाश घोलप यांचे चिरंजीव व इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती करणसिंह घोलप पहिल्यांदाच छत्रपतीच्या माध्यमातून सहकाराच्या रिंगणात उतरले आहेत. माजी आमदार स्वर्गीय राजेंद्रकुमार घोलप हे 1980 ते 1985 पाच वर्षे आमदार होते.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन काँग्रेसमध्ये सभापती पद भूषवलेले करणसिंह घोलप महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे सभापती होते.

सुरुवातीला एकाएकी होईल असे वाटणाऱ्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत घोलप यांच्या एन्ट्री ने श्री छत्रपती बचाव पॅनलने निवडणूकीत मोठे आवाहन जाचक व पवार यांच्या समोर उभे केले आहे. हि निवडणूक वाटते तेवढी सोपी राहिली नसल्याचे चित्र दिसत आहे.

तर घोलप यांच्या सोबत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तानाजीराव थोरात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संग्रामसिंह निंबाळकर, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती तुकाराम काळे हे श्री छत्रपती बचाव पॅनल मधुन निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

घोलप कुटुंबीयांच्या दोन पिढीची पुण्याई तिसऱ्या पिढीच्या कामी येणार.?

छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, तालुक्याचे आमदार म्हणून स्वर्गीय राजेंद्रकुमार घोलप यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व तत्कालीन मंत्री कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आयुष्यभर काम केले. या काळात अनेक संसार उभारण्याचे काम त्यांनी केले.

इंदापूर तालुक्यातील अनेक सहकारी संस्थांच्या जडणघडणीत आमदार स्वर्गीय राजेंद्र कुमार घोलप यांचा सहभाग होता.

राजेंद्रकुमार घोलप यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी राजकारण, समाजकारण करताना मोठे काम केले. ते स्वतः प्रगतशील शेतकरी होते व त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्नांची जाण होती, तीच परंपरा पुढील काळात त्यांचे सुपुत्र छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप व पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तसेच छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब घोलप यांनी जपली.

मदत मागणारा त्यांच्या दारातून रिकाम्या हाती गेला नाही..

इंदापूर तालुक्यातील कुठल्याही भागातील गरजू व्यक्ती घोलप कुटुंबियांच्या दारात मदत मागण्यासाठी गेला तर तो कधी रिकाम्या हाती परतला नाही, तालुक्यातील एखाद्या गरीब व्यक्तीच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका त्यांच्या दारात पोचली तर पत्रिके सोबतच मदत त्या गरीब घराला मिळत असे. गावगाड्यातील जत्रेतील वर्गणी, युवकांनी भरवलेल्या क्रीडा व इतर मनोरंजन कार्यक्रमासाठी तसेच जयंती व इतर कार्यक्रमाच्या साठी लागणारी मदत घोलप कुटुंबीय मोठ्या दिलदार पणाने करत असल्याचे बोलले जाते.

स्वर्गीय राजेंद्र कुमार घोलप त्यांचे पुत्र अविनाश घोलप व बाळासाहेब घोलप यांच्यानंतर आत्ता घोलप कुटुंबियांची तिसरी पिढी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक रिंगणात उतरली आहे. त्यामुळे दोन पिढीने केलेल्या सामाजिक कामाची पुण्याई करणसिंह यांना मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष असेल.

करणसिंह घोलप यांना प्रांत कार्यालयाच्या आवारातच धक्काबुक्की

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अर्ज माघार घेण्याच्या अखेर च्या दिवशी अनेक घडामोडी पहायला मिळाल्या असून अगदी अखेरच्या क्षणी पंचायत समितीचे माजी सभापती करणसिंह घोलप यांना प्रांत कार्यालयाच्या आवारातच धक्काबुक्की झाल्याची चित्रफीत समाज माध्यमातुन मोठ्या प्रमाणात फिरत होती.त्यामुळे छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक वाटते तेवढी सोपी राहिली नसल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button