श्री छत्रपती बचाव पॅनेल ची उमेदवार यादी जाहीर.! दिग्गज उमेदवारांचा समावेश.
विजय शिंदे
श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक २०२५-२०३० साठी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे व पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखालील जय भवानी माता पॅनल उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर विरोधी श्री छत्रपती बचाव पॅनल ची अधिकृत घोषणा करण्यात आली असून खालील उमेदवार श्री छत्रपती बचाव पॅनलच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहेत.
यामध्ये भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तानाजीराव थोरात, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती करणसिंह घोलप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संग्रामसिंह निंबाळकर, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती तुकाराम काळे यांचा समावेश आहे.
- श्री छत्रपती बचाव पॅनेल उमेदवार
मतदार संघ
उमेदवाराचे नांव
गट नं. १ लासुर्णे
१) श्री. संजय सोमनाथ निंबाळकर
२) श्री. प्रताप मोहन पवार
गट नं. २ सणसर
१) श्री. संग्राम दत्तात्रय निंबाळकर
२) श्री. अभयसिंह विठ्ठलराव निंबाळकर
गट नं. ३ उध्दट
१) श्री. करणसिंह अविनाश घोलप
२) श्री. तानाजी साहेबराव थोरात
गट नं. ४ अंथुर्णे
१) श्री. राजेंद्रकुमार बलभिम पाटील
२) श्री. बाबासो भगवान झगडे
गट न ६ सोनगाव
१) रवींद्र भीमराव टकले.
गट नं. ७ गुणवडी
१) श्री. नितीन अशोक काटे
ब वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन
१) श्री. सत्यजीत भाऊसाहेब सपकळ
अनुसूचित जाती/जमाती
१) श्री. बाळासो उर्फ भाऊसो गुलाब कांबळे
महिला राखीव
१) सौ. सिता रामचंद्र जामदार
२) सौ. पद्मजा विराज भोसले
इतर मागास प्रवर्ग
१) श्री. संदिप वसंतराव बनकर
भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास
१) श्री. तुकाराम गणपत काळे




