Uncategorized

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा भारतीय लष्कराने बदला घेतला;पाकिस्तानच्या हद्दीत घुसुन दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले .

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती.या हल्ल्याला भारताकडून करारा जवाब दिला जाईल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ठणकावून सांगितलं होतं.पहलगाम हल्ल्यानंतर सरकार आणि भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांचे प्रमुख अधिकारी यांच्यात बैठकांचा धडाका लावला सुरू होता.पण भारतकशी आणि कधी कारवाई करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं.

अखेर भारताकडून पहलगाम हल्ल्याचा बदला घेताना पाकिस्तानच्या हद्दीत घुसुन दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले उध्वस्त करण्यात आले आहेत.पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा(Pahalgam Terror Attack) भारतीय लष्कराने बदला घेतला आहे. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे, ज्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. या हल्ल्यात एकूण नऊ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, जिथून दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि निर्देश केले जात होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button