Uncategorized

छत्रपती कोणाचा बापू की दादा.? अविनाश घोलप यांचा सर्वपक्षीय छत्रपती बचाव पॅनल.

छत्रपती बिनविरोध नाहीच..

विजय शिंदे

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कृती समितीच्या संयुक्त जय भवानी माता पॅनलचे उमेदवार आज जाहीर करण्यात आले राष्ट्रवादीचे बारामती तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे व ज्येष्ठ नेते किरण गुजर यांनी ही यादी जाहीर केली.यानंतर छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आणखी रंगत आली असून माजी चेअरमन अविनाश घोलप यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय छत्रपती बचाव पॅनल ची घोषणा करण्यात आली आहे.

यामुळे पृथ्वीराज जाचक विरुद्ध अविनाश घोलप अशी तगडी लढत इंदापूर व बारामती तालुक्यातील जनतेला पाहायला मिळणार आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर गेली अनेक वर्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे परंतु गेल्या दहा वर्षातील कारभारावर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका करत विद्यमान संचालक मंडळातील एकालाही पुन्हा उमेदवारी दिलेली नाही. विरोधी असणाऱ्या पृथ्वीराज जाचक यांना सोबत घेतल्याने याचा कितपत फायदा अजित पवार यांच्या पॅनलला होणार हे येणाऱ्या काही काळात दिसून येणार आहे. तर अविनाश घोलप यांनी यापूर्वी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची धुरा सांभाळली आहे.छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते परंतु बहुसंख्य सभासदांनी अर्ज दाखल करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून येते.

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संग्राम निंबाळकर यांनीही अविनाश घोलप यांच्या सर्वपक्षीय छत्रपती बचाव पॅनल मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button