Uncategorized

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहा– महादेवनगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन.

विजय शिंदे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुक्यातील शहा महादेव नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंदापूर तालुका व भगवानराव भरणे प्रतिष्ठान यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी युवा नेते श्रीराज भरणे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, सचिन सपकळ, पंचायत समितीचे माजी सदस्य सतीश पांढरे शुभम निंबाळकर उपस्थित होते.

यावेळी शहा येथे ५० बॉटल रक्त संकलित करण्यात आले तर महादेवनगर येथे ५५ बॉटल रक्त संकलित करण्यात आले.

यावेळी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी तात्यासाहेब जाधव, नितीन निकम, आबासाहेब देवकाते, शिवाजीराव पांढरे, प्रकाश निकम ,बाळासाहेब पांढरे, शिवाजी शिंदे ,इरफान मुलानी, बाळासाहेब पांढरे, राजेंद्र निकम ,राजेंद्र येळे ,पांडुरंग कुंभार, भागतराव कुंभार ,विलास कडवळे, बाबासाहेब बनसोडे, किशोर धाईजे, संतोष कडवळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button