हनुमंत कोकाटे यांच्यावर कारवाई करा; खासदार सुप्रिया सुळे यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी.

विजय शिंदे
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्यानंतर इंदापुरातील दोन्ही राष्ट्रवादीमध्ये वाद रंगला, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा राजीनामा मागितला यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेत महारुद्र पाटील यांना हाताखालून काढू अशी भाषा वापरली.यामुळे इंदापूर तालुक्यातील दोन्ही राष्ट्रवादीत चांगलाच वाद रंगला आहे.

यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी उडी घेतली असून थेट पोलीस अधीक्षकांना यामध्ये लक्ष घालून हनुमंत कोकाटे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यामुळे भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर इंदापूर तालुक्यात या दोन्ही राष्ट्रवादीमध्ये शाब्दिक वाद रंगण्याची चर्चे आहे.
काय म्हणाल्या खा सुप्रिया सुळे..
राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे समर्थक हणुमंतराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे (@NCPspeaks) इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सत्तेचा पाठिंबा असल्याशिवाय या पद्धतीने सराईतासारखी जाहिर धमकी देण्याचे धाडस कोणताही जबाबदार राजकीय नेता करु शकणार नाही. महारुद्र पाटील हे एक जबाबदार पदाधिकारी असून गेली अनेक वर्षे ते राजकारण तथा समाजकारणात सक्रिय आहेत. त्यांना ‘ऑन कॅमेरा’ धमकी देण्याचे धाडस करणाऱ्या कोकाटेंवर गुन्हा दाखल होण्याची गरज आहे. माझी पोलीस अधीक्षक, पुणे जिल्हा ग्रामीण (@puneruralpolice) यांना विनंती आहे की कृपया आपण या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी आणि सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा.



