Uncategorized

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पदवीधर मतदारांनी नोंदणी करण्याचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांचे आवाहन.

विजय शिंदे.

पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणुक प्रक्रिया लवकरच सुरु होण्याची शक्यता गृहीत धरुन राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे, पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीसाठी सर्वच राजकीय पक्ष व संघटना कामाला लागले आहेत.

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ अंतर्गत पदवीधर तसेच शिक्षक मतदार नोंदणी करण्यास सुरुवात झाली असून पुणे (दक्षिण) ग्रामीण जिल्ह्यातील पात्र मतदारांनी ६ नोव्हेंबरपूर्वी मतदार यादीमध्ये आपल्या नावाची नोंदणी करावी असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनी केले आहे.

या वेळी बोलताना जिल्हाध्यक्ष शेखर वढणे म्हणाले मागील पदवीधर निवडणुकीवेळी केलेली मतदार नोंदणी रद्द झाली असून पुन्हा नव्याने नोंदणी करणे आवश्यक आहे. १ नोव्हेंबर २०२२ पुर्वीचा पदवीधर असणे आवश्यक आहे किंवा १ नोव्हेंबर २०२५ रोजी पदवीस तीन वर्षे पूर्ण झालेली असावीत.पक्षाच्या विचाराचे जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्यास प्राधान्य देऊन जास्तीत जास्त मतदार नोंदणी करून पक्षसंघटनेच्या पातळीवर मतदारांच्या गाठीभेटी घेवून पक्षाची ध्येय धोरणे मतदारापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्‍यांची आणि कार्यकर्त्यांची आहे. मतदार नोंदणीसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घरापर्यंत जावून कागदपत्राची जुळवाजुळव करुन मतदार यादीत त्यांचे नाव समाविष्ट करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे आवाहन त्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button