Uncategorized

१२वी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षेचा निकाल उद्या ५ मे रोजी होणार जाहीर;मोबाईलवर सर्वात आधी ‘असे’ पाहा गुण.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या १२वी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षेचा निकाल ५ मे २०२५ रोजी जाहीर केला जाणार आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं (MSBSHSE) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC/12th) निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे.

यावेळी बोर्डाने नेमकं काय सांगितलं हे पाहूया..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं (MSBSHSE) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC/12th) निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर केला जाईल. बोर्डाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जाऊन गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहू शकतील.

मोबाईलवर सर्वात आधी ‘असे’ पाहा गुण.

उद्या म्हणजेच ५ (मे) तारखेला जेव्हा निकाल खरोखरीच जाहीर होईल तेव्हा साहजिकच एकाच वेळी साईटवर लोड आल्याने क्रॅश होण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्ही आपल्या मोबाईल फोनवर सगळ्यात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करू शकता.महाराष्ट्र बोर्ड 12 वी निकाल 2025 : निकाल साईटवर कसा तपासायचा?अधिकृत वेबसाइटला mahresult.nic.in वर भेट द्या.मुख्यपृष्ठावर उपलब्ध महाराष्ट्र SSC, HSC निकाल 2025 लिंक तपासा.लॉग इन तपशील ऍड करून सबमिट वर क्लिक करा.एंटर क्लिक करा आणि पेज डाउनलोड करा.निकाल डाउनलोड केल्यानंतर प्रिंट काढा.महाराष्ट्र बोर्ड12 वी निकाल 2025: मोबाईलवर SMS मध्ये कसा समजेल निकाल?नवा एसएमएस या फॉरमॅटमध्ये तयार करा: MHHSCSEAT नं.57766 वर एसएमएस पाठवा.महाराष्ट्राचा HSC/12वीचा निकाल त्याच क्रमांकावर पाठवला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button