Uncategorized

उजनी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ..

विजय शिंदे

गेल्या दहा दिवसापासून पुणे व परिसरात सुरू असलेल्या पावसाने उजनी धरणातील पाणी पातळी वाढली आहे.यामुळे कोरड्या पडलेल्या बंधाऱ्यात पाणीसाठा जमा झाला आहे.

गेल्या दहा दिवसापासून पुणे व परिसरात पावसाची जोरात बॅटिंग सुरू असून उजनी धरणात तर चार टीएमसी एवढे पाणी जमा झाले आहे. या जोरदार पावसामुळे आज (२५ मे) उजनी धरणात तब्बल दहा हजार क्युसेक वीसर्गाने पाणी येत आहे. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात जवळपास १७१ मिलिमीटर एवढा पाऊस या दहा दिवसात कोसळल्याने उजनीची पाणी पातळी झपाट्याने वाढू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button