Uncategorized

इंदापूर तालुक्यातील गट गण रचनेवर ९ ठिकाणी आक्षेप.

विजय शिंदे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वातावरण आता हळूहळू तापू लागले आहे. गेली तीन वर्षांचा खंडानंतर ही निवडणूक होत असल्याने निष्क्रिय असलेले सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकारी आता पुन्हा सक्रीय झाले आहेत.

इंदापूर तालुक्यात नव्याने गट गण रचना करण्यात आली असून नव्या रचनेवर ९ ठिकाणी आक्षेप नोंदवले गेले आहेत. तर पुणे जिल्ह्यात एकूण २१७ हरकती आणि सूचना दाखल झाल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. या प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे गट व गण रचना. जिल्हाधिकारी कार्यालयाने ही प्रारूप रचना तयार करून आठवडाभरापूर्वी प्रसिद्ध केली होती. त्यावर हरकती व सूचना नोंदविण्याची अंतिम मुदत २१ जुलै होती प्राप्त हरकतींपैकी सर्वाधिक ८७ हरकती खेड (राजगुरुनगर) तालुक्यातून आल्या असून, त्यानंतर हवेली तालुक्यातून ६२ आणि शिरूरमधून १६ हरकती प्राप्त झाल्या आहेत. तर पुरंदर तालुक्यातून फक्त १ हरकत दाखल झाली आहे.

ही सर्व हरकती व सूचना २८ जुलैपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयात सादर करावयाच्या आहेत. त्यानंतर विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली यावर सुनावणी होईल. या सुनावणीनंतरच गट व गणांची अंतिम रचना निश्चित केली जाणार आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती व भारतीय जनता पार्टीचे इंदापूर तालुक्यातील नेते प्रवीण माने यांच्या पळसदेव बिजवडी या जिल्हा परिषद गटातही हरकत दाखल करण्यात आली.

माने यांचे रुई हे गाव नव्याने रचना करण्यात आलेल्या शेळगाव गणात गेले आहे, हे गाव पुन्हा एकदा पळसदेव बिजवडी गटात घ्यावे यासाठी हरकत दाखल करण्यात आली आहे.

यासाठी रुई या गावातील नागरिकांनी आंदोलन केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button