माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्री.पळसनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

पळसदेव ता.२१ . महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय कामकाज व सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटीलसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे यांनी दिली.
वाढदिवसाचे औचित्य साधून पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विद्यालयातील पूर्व प्राथमिक माध्यमिक विभाग व पळसनाथ मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहातील गरजु विद्यार्थ्यांना शालोपयोगी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
तर कर्मयोगीचे संचालक व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे यांनी विद्यालयाच्या वतीने पळसनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले. यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे म्हणाले की माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विद्यालयासाठी विविध भौतिक शैक्षणिक सुविधा, इमारतनिधी, विद्यार्थी विकास योजनेच्या माध्यमातून भरीव मदत केलेली आहे. त्यांच्या योगदानातुनच पळसदेव सारख्या ग्रामीण भागातही दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम शिक्षण संस्था करीत आहे. दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यालयात वृक्षारोपण, शालेय साहित्य, खाऊ वाटप, रक्तदान शिबीर आदि विधायक उपक्रम राबवले जातात.याप्रसंगी पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे, सचिव योगीराज काळे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सुरेश थोरात रणजीत काळे विद्यालयाचे प्राचार्य विकास पाठक पर्यवेक्षक संजय जाधव अशोक जाधव मल्हारी काळे, अविनाश शेलार नंदकुमार कदम सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अडवाल मॅडम यांनी केले तर आभार आप्पासाहेब यमपुरे यांनी मानले.



