Uncategorized

शुक्रवारी (११ जुलै) ठरणार इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत चे नवे कारभारी.

विजय शिंदे

इंदापूर तालुक्यातील ११६ ग्रामपंचायतची सरपंच आरक्षण सोडत शुक्रवार ११ जुलै रोजी होणार आहे. येथील वाघ पॅलेस सभागृह येथे १२ वा. ही सोडत होणार आहे.

ओबीसी आरक्षणामुळे मागील सरपंच आरक्षण रद्द झाल्याने नव्याने सरपंच आरक्षण सोडत घेण्यात येणार आहे, ही आरक्षण सोडत पाच वर्षासाठी असून चिठ्ठी पद्धतीने करण्यात येणार आहे.अशी माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली.

काही महिन्यापूर्वी झालेले इंदापूर तालुक्यातील एकूण ११६ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण रद्द झाले आहे. ग्रामपंचायत निवडणूक नियमातील तरतुदीनुसार अनुक्रमे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागासवर्गाचा प्रवर्ग आणि स्त्रीया (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागासवर्गाचा प्रवर्ग यातील स्त्रीयांसह) यांच्यासाठी आता नव्याने आरक्षित करायची आहे.

आता निवडणूक होणार की पुन्हा सोडतच निघणार.?

यापूर्वी सरपंच पदाचे आरक्षण सोडत झाली असून मुदत संपलेल्या २२ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदार यादी ही प्रसिद्ध झाली होती. परंतु बदलत्या नियम व धोरणामुळे इच्छुकांच्या तयारीवर पाणी फिरले. यामुळे आता इच्छुक मात्र चांगलेच धास्तावले आहेत.

यापूर्वी काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये बदल झाल्याने केलेली तयारी वाया गेली, आता या सोडतवर निवडणुका पार पडणार की पुन्हा सोडतच निघणार यामुळे इच्छुकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button